Wednesday 11 November 2020

पेठ - कोथळीगड (Peth Kothaligad)


      आदल्या रात्री 'इर्शाळगड'ची तयारी केली आणि ऑक्टोम्बर परतीच्या पावसानं रात्रभर जोर धरला. ट्रेक स्थगित केला. सकाळी सगळे आरामात उठलो. पाऊस थांबला होता. आता इतकी तयारी केलीय, बेत ठरलाच होता तर, पावसामुळं इर्शाळगड नाही पण बाहेर पडून, दुसरा करू असा मुलीचा हट्ट. आमचं आटपेपर्यंत पत्नीनं खायचं बनवलं. सकाळी नऊ वाजले होते, उशीर तर झालाच होता. निघालो आणि 'भिवगड' ठरवून गौरकामत गावात पोहचलो. साडेदहा झाले. इथपर्यंत आलोच तर कोथळीगड का नको, म्हणून पत्नीनं ऐनवेळी 'कोथळीगड' नक्की केला आणि आम्हा तिघांच्या गळी उतरवला.

      पुन्हा पुढे २५ किमीचा प्रवास करत भरदुपारी बारा वाजता अंबीवाडी गाठली. पुढे गडपायथ्याचं आदिवासी गांव 'पेठ' चार किलोमीटरवर.. निघालो पण डोंगरातील चढणीचा आणि निमुळता रस्ता बऱ्याच ठिकाणी पावसानं वाहून गेलेला तर काही घळीत खचलेला. गाडीसाठी धोकादायक होता.

प्रवेशदारावरील  शरभ आणि बाजूला गणेश शिल्प



      निर्णय बदलला, पुन्हा परतलो. गाडी अंबीवाडी सोडून जंगलात रस्त्याकडेला पार्क केली आणि सहयादीच्या कर्जत डोंगररांगेतील ३१०० फूट उंचीवर असलेल्या 'कोथळा'गडास पायी निघालो
                

Kothaligad
अंबीवाडी ते पेठ   

समोर दिसणारा कोथळीगड

   
    ऑक्टोबरची गरमी आणि डोक्यावर कडक ऊन्ह्  घेत सावलीसावलीनं दमछाक करत डोंगर चढुन पेठ गाठलं. अंबीवडी ते पेठ चालत तास दीड तास लागतोच.गावाबाहेर एका बंद घराच्या पडवीत आम्ही खाणं आटोपलं आणि अर्ध्या तासातच दुसऱ्या अवघड टप्प्याला सुरवात केली.

पेठ गावातून दिसणारा किल्ला 
                               
     गावात न शिरता बाहेरूनच जाणाऱ्या रस्त्यावर गडपायथ्याला "किल्ले पेठ कोथळीगड" चा बोर्ड स्वागत करतोएका दगडावरून दुसऱ्यावर उंच पाय टाकत जाणारी वाट दमछाक करते, त्यामुळं बरेच जण हा ट्रेक अर्धवट सोडून आलेत. असं एक दाम्पत्य आम्हाला आम्ही पेठ गावात पोचण्याआधीच परत आलेले भेटलं.


 
    पुढचे टप्पे चढताना मात्र शारीरिक कस लागतो. वाटेवर चाफ्याच्या झाडांनी गारवा दिला पण होणाऱ्या दमछाकीनं पाणी खूप लागत होतं. वर तिरकस तर कधी सरळ चढणारी वाट सावध, सांभाळून चढावी लागली. गडमाथ्याजवळ कारवीची उंच झुडपं गडपठाराचा अंदाज लागू देत नाहीत. पायथ्याच्या पेठ गावातून गडावर पोचण्यास एक तासभर लागला.

किल्ले कोथळीगड 

      संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोगलांनी या छोटेखानी किल्ल्यास जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्याच्या नैसर्गिक कतळकड्याच्या तटबंदीनं दाद दिली नाही. पुढे मोगलांना फितूर झालेल्या मानकोजी पांढरे सरदाराच्या मदतीनं,फितुरीनं गडाची दारं उघडली आणि झालेल्या हातघाईत मराठ्यांना गड गमवावा लागला. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी त्याच भीषण कातळकड्यांना दोरांच्या शिड्या लावून आत घुसण्याचा प्रयत्न केला.बंदूक आणि बाणांचा वापर झाला. खूप रक्तपात झाला,पण यश आले नाही. 


प्रवेशदारातून गडमाथ्यावर येणारी वाट 

        पुढे दुसऱ्या बाजीरावांच्या कारकिर्दीत हा गड मराठ्यांकडे आला. सुमारे एकोणिसाव्या शतकाच्या मध्या पर्यंत या गडावर वहिवाट होती. त्यानंतर ती गडपायथ्याला 'पेठ'गावात वसली.
     
      गडपठारावर पोहचताच किल्ल्याचा एकमेव बुरुज भगवा फडकावीत स्वागत करतो. पुढे पायऱ्यांचे आणि प्रवेशदाराचे अवशेष दिसतात. त्यापुढे गडाच्या कातळात कोरलेल्या गुहा आहेत.वर बुरुजावर कातळात एक प्रशस्त मोठी गुहा आहे. परंतू ती वस्ती करण्यायोग्य नाही.
 
   सुरवातीला पहिली देवीची गुहा आहे.त्यापुढे दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत.बाजूला भैरोबाची गुहा आहे.
 
     भैरोबाची गुहा मोठी प्रशस्त असून आत छताला आधार देणारे सुबक कोरीव दगडी खांब आहेत 

         

भैरोबाची गुहा 

 
खांबावरील कोरीव नक्षीकाम 
                  
  
      दसऱ्यात, घटस्थापनेच्या दिवसात 'पेठ' चे रहिवाशी गडावरील देवीचं नऊ दिवस जागरण करतात आणि रात्री गडावरच गुहेत वस्ती करतात. नवरात्रीत आमचं तिथं जाणं निव्वळ योगायोग होता. 
       

देवीची गुहा 
         

     बाजूलाच दुसऱ्या गुहेत गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळाच्या आतून पायऱ्या कोरल्या आहेत.काही जुने तोफेचे गोळे आहेत.सुरवातीच्या पायऱ्या तुटल्यामुळं काळजी घ्यावी लागते. उभ्या चढाच्या उंच पायऱ्या कातळच्या पोटातून वळसे घेत गडमाथ्याच्या प्रवेश दाराजवळ पोहचतात.

किल्ल्याच्या कातळात  कोरलेल्या पायऱ्या. 

       दाराजवळ पोहोचण्या आधी एक छोटा आणि धोकादायक टप्पा पार करावा लागतो. गडमाथ्याच्या प्रवेशदाराची कमान दगडात कोरलेली आहे. चौकटीच्या बाजूला कातळावर शरभ कोरलेलं असून बाजूला गणेश मूर्ती कोरली आहे. सध्या गणेशमूर्ती भग्नावस्थेत दिसते.

                              

प्रवेशद्वार 

      प्रवेशदार लाकडी असून त्यावर टोकदार लांब खिळे आहेत. ते नजीकच्या काळात केल्याचा अंदाज येतो. पुढे पायऱ्या चढून गडमाथ्यावर जाता येतं. गडमाथा लहान असून सध्या रान आणि झुडपं माजली आहेत. गडमाथ्यापर्यंतची वाट काही टप्प्यात काळजीपूर्वक चढावी लागून दमछाक करणारी आहे.


मराठ्यांच शस्त्रागार इथं होतं 

      गडमाथ्यावरून माणिकगड, इर्शाळगड, प्रबळगड आणि माथेरानचे डोंगर असे विहिंगम दृश्य दिसतं. धुक्यामुळं चंदेरी आणि त्या पलीकडील मलंगगड धूसर दिसतात.




    या उंचीवरून समोरचा अफाट परिसर आणि निसर्ग बघून मन तृप्त होतं. इथं पोचण्यासाठी केलेली पायपीट, दगदग विसरून जातो

     परतीच्या वेळी गडावर असतानाच अचानक अंधारुन मुसळधार पाऊस सुरू झाला. मोठी अडचण निर्माण झाली.भिजत भिजतच खाली गावात पोहोचलो आणि राहण्याची चौकशी केली. एक टपरीवाला टेंट टाकून देण्यास तयार झाला, पण आमचे बदलीचे कपडे अंबीवडीत गाडीत राहील्यानं ओल्या कपड्यात रात्र काढणं जीवावर आलं. काहीही करून अंबीवाडी गाठणं गरजेचं होतं.अंधारामुळे हाताशी वेळही कमी होता. त्यामुळं मनाचा हिय्या करुन मुसळधार पावसात भिजत,दगड धोंडयातुन ठेचकाळत निघालो. अंधारातुन चिखलातली अंबीवाडीपर्यंत केलेली चार किलोमीटरची जंगलातली पायपीट कायमची लक्षात राहिली.. 
               || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव  

61 comments:

  1. फार सुंदर ट्रेक आणि वर्णन 👌👌

    ReplyDelete
  2. खूप छान वर्णन केले आहे... 👌👍✌

    ReplyDelete
  3. खूप छान 👌👌👍👍

    ReplyDelete
  4. Very informative...keep it up....!!!

    ReplyDelete
  5. वर्णन चांगले केले आहे.अप्रत्यक्षपणे गडावर गेल्याचा भास होतो.

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिले आहे, खूपच सुंदर...

    ReplyDelete
  7. खूप छान आणि सुंदर

    ReplyDelete
  8. जेके खुप छान आणि धाडसी फॅमिली.

    ReplyDelete
  9. खुप छान आदर्श कुटुंब

    ReplyDelete
  10. जयवंत तू किल्ले कोथळीगड ट्रेक केलास त्या बद्धल तुमच्या सर्वांचे मनापासून आभिनंद,तू एतक सुन्दर वर्णन केलास की मी प्रत्यक्ष तो शीण पाहत आसल्याचा भास होतो.तू दाखवलेले फोटोज अणि वर्णन अतिशय सुन्दर अणि महत्वाचे म्हणजे तूम्ही घरचेच लोक गेलात, एक आदर्श अणि धाडशी कुठूब ,आशेच लिहीत रहा धन्यवाद

    ReplyDelete
  11. छान,धाडसी अनुभव.
    चालू ठेव.

    ReplyDelete
  12. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माझ्याकडून मानाचा मुजरा. उत्तम साजरीकरण उत्तम लेख. यशस्वी वाटचाल कुटुंबासोबत mhands upps सॅल्यूट. Sir. Brave

    ReplyDelete
  13. अतिशय विस्तृत,जिवंत आणि मुद्देसूद वर्णन!

    ReplyDelete
  14. अप्रतिम फोटोग्राफी....

    ReplyDelete
  15. खूपच छान फोटोग्राफी /अप्रतिम लेखन /आपण सर्वजण धाडसी असल्यामुळेच प्रवास सुखकर झालेला आहे सर्वाना शुभेच्छा!🌹🙏🌹

    ReplyDelete
  16. Very informative blog and beautiful photos.keep trekking
    All the best for next treks.

    ReplyDelete
  17. अप्रतिम वर्णन, लेखन आणि फोटोग्राफी

    ReplyDelete
  18. अप्रतिम वर्णन क्षण भरात तुमच्या ट्रेक चे पूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले.खुप सुंदर असेच लिहित रहा


    ReplyDelete
  19. खुपच छान शरभ व पाणि टाकी दगडातील फोटो व माहीती दिलया बद्दद्ल धनयवाद

    ReplyDelete
  20. Chan lihila aahe.keep it up and best wishes!

    ReplyDelete
  21. Sundar lihla aahe khup. Beautiful photos. Next time me pan yete.

    ReplyDelete
  22. Its worth reading!!🔥🔥
    You have elaborated your experience in really very interesting way!!👏
    Keep Going,Keep Growing, and Keep Writing!!🔥

    ReplyDelete
  23. Very nice... chan lihila aahe..

    ReplyDelete
  24. Best blog I ever read related to hill climbing. This information is very useful to those who have strong desire to go for any trek but not able due to unknown places. Thank you very much, my friend Jaywant Jadhav Saheb.

    ReplyDelete
  25. khup chan blog and it will guide others . keep it up ☺️

    ReplyDelete

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...