पावसानंतर लगेच एखादा ऑफबीट ट्रेक करून निसर्ग अनुभवायचा असेल तर, 'इर्शाळ'ला विसरून चालणार नाही. अगदी मुंबई-ठाण्यापासून जवळच आणि एका दिवसात करण्यासारखा. झालंही तसंच, ठरवलेला इर्शाळ पावसामुळं स्थगित झाला आणि कोथळीगड केला. कोथळीगडानं आम्हाला भन्नाट अनुभव दिला. दिवाळी समोर असताना त्यानंतर लगेच 'इर्शाळ' करणं शक्यही नव्हतं. मनात हुरहूर होतीच. तसं पाहिलं तर मागील वर्षी याच दिवसात केलेला पेबचा विकटगड, प्रबळगड, आम्ही अनेकदा गेलेलो कर्नाळा आणि आत्ताचा 'इर्शाळ' हे सगळे सह्याद्रीच्या माथेरान डोंगररांगेत येणारे. अति कठीण नसले तरी धोकादायक. चढाईच्या बाबतीत दमवणारे आहेत. या सर्वांचा एक गुणधर्म म्हणजे अरुंद, तीव्र उतारावर पायाखालची घसरणारी इथली माती. एकदा घसरलो की खालच्या एक दोघांना घेऊनच खाली जाणाऱ्या इथल्या वाटा.. पेबच्या विकटगडला तर परतीच्या वेळी अंधारातून ढोरवाटाही तुडविल्यात. सह्याद्रीत अनेक उंच डोंगर, गड किल्ले आहेत. ऑफबीटही आहेत. पण खुमखुमी जिरवायची असेल तर माथेरानच्या रांगेतले दोन-तीन करावेच.
योग जुळून आला आणि दिवाळीच्या आदल्या रविवारी निघालो. भल्या सकाळी खायचं बांधून घेऊन घर सोडलं. 'इर्शाळ' तसा पनवेलच्या राहत्या घरापासून जवळच २५ किलोमीटरवर म्हणता येईल. चौकच्या अलीकडे डाव्या बाजुला एखाद्या मैलावर., मुंबई पुणे हायवेवरून त्याच्या विशिष्ट आकारामुळं नजरेत येतो. तर पुण्याहून येताना खालापूर टोलनाका सोडल्यावर 'चौक' नंतर उजवीकडे.. शरीरसौष्ठव स्पर्धेत मूठ वळावी, त्या मुठीच्या आकाराचा, सह्याद्रीतील ३७०० फूट उंचीचा बेलाग उघडा कातळ. अगदी रस्त्याकडेला म्हणता येईल. याचं सौंदर्य बघायचंय त्यांनी पावसानंतर लगेच जावं. एकदा का ऊन्ह तापली की डोंगर ऊतारावरची फुलं लुप्त होतात. चौक रेल्वे स्थानक सोडून उजवीकडे मोर्बे जलाशयाकडे जाणारा रस्ता थेट इर्शाळगडाला घेऊन जातो. स्वतःचं वाहन असेल तर 'नानिवली' गावापर्यंत जाता येतं किंवा 'वडाप' आहेच. आम्ही सकाळी नऊ वाजता नानिवलीपासून पायवाटेनं चढाई सुरु केली. सुरुवातच मुळी तीव्र चढानं सुरू झाली. हा चढ खुप दमछाक करतो. एक संपला की दुसरा, असा टप्प्या टप्प्यानं दमवतो. एक दोनदा बसायला लावून पाणी पाजतोच.. हा चढ संपला की मागे वळून पाहिल्यास मोर्बे धरणाच्या जलाशयाचा परिसर खूप सुंदर दिसतो. नजरेच्या पूर्ण टप्प्यात येतो.
इथपर्यंत डोंगर उघडा आणि रखरखीत निष्पर्ण आहे. पुढच्या पाऊलवाटेची चढाई थोडी कमी होत जाऊन, अधून मधून सावली देणारी झाडं आहेत. तर मधेच ही वाट डोंगराच्या अरुंद सोंडेवरून, कमरेइतक्या गवतातून सरळ पठारावर आणून सोडते. या पठारावरून इर्शाळगडाचं क्षणिक दर्शन होतं. पुढे चालत राहिल्यास तास दिड तासात इर्शाळवाडी दिसू लागते.
इर्शाळवाडी हे गडाच्या पायथ्याचं छोटं आदिवासी गांव. शहरापासून जवळ असूनही मागासलेले. गावात सुखसुविधा आजून पोहचायच्या आहेत. इथं भातशेती मात्र विपुल करतात. गावचे तरुण दिवसभर क्रिकेटच्या मॅच मध्ये रंगलेले दिसतात. असो.
इर्शाळवाडीतुन दिसणारा गड उजवीकडे ठेवून, वाट गडाला वळसा मारण्यासाठी डावीकडून पुढे जाते. गाव सोडताच, गावाबाहेर पाऊल वाटेवरच्या उतारावर गडाची अधिष्ठाती 'श्री विशाळा' देवीचं छोटं देऊळ आहे. विशाळा देवीच्या नावावरून गडाला "इर्शाळगड" नांव पडलं असावं.

श्री विशाळा देवी

ही वाट पुढे गडाच्या डाव्या बाजूनं चढाची तीव्र वळणं घेत एका सपाटीवर पोहोचते आणि या इर्शाळ माचीवरून समोर इर्शाळचा महाकाय सुळका नजरेत येतो.
पठारावरून पुढे सुळक्याकडे जाऊन वाट पुन्हा डावीकडे जाते ते थेट गडाच्या मागच्या बाजूला पोहचतो. सुरवातीला इर्शाळवाडीतून गड समोरच दिसतो पण जाण्याची पाऊलवाट व गडचढाई मात्र मागून, फिरूनच करावी लागते.
पुढे नजरेसमोर प्रचंड दरीपलीकडचा प्रबळगड ठेवून वाट थोडी उतार होत इर्शाळच्या कातळाला समतल जाते. इथे एक भला मोठा तुकडा या कातळपासून सुटून डोंगरा लगतच उतारावर स्थिरावला आहे. या दोन्हींच्या मधून जेमतेम एखादी व्यक्ती अंग चोरून पलिकडं सरकेल इतकी चिंचोळी वाट उरली आहे.निखळलेला आणि जिथून निखळला त्या कातळाच्या पृष्ठभागावर निळसर हिरवा रंग दिसतो. अशाच नैसर्गिक टिकाऊ रंगांचं मिश्रण ई. स. पूर्व दुसऱ्या शतकातील औरंगाबाद येथील अजिंठ्यासारख्या लेण्यातील चित्रे रंगवण्यासाठी वापरलं असावं.

कातळामधील चिंचोळी वाट

खंडकांवरील रंग


वाट पुढे उजवीकडे वळून, मोठमोठ्या दगडातून अवघड टप्पे चढत कातळावर जाते. उजवीकडे वळण्याआधी आपण पुढे सरळ गुहेत जावू शकतो, पण गुहेची वाट जीवावर बेतणारी असल्यानं ती अलीकडेच बंद केली आहे. कातळावर चढाई करण्यापूर्वी उजवीकडं उतारावर एक पाण्याची टाकी कोरली आहे. त्यात पावसाचं पाणी जमा होतं. गडावरुन टेहाळणी करणाऱ्यास त्या पाण्याचा उपयोग होत असावा.
पुढे कातळाच्या तीव्र उतारावर चार पायंड्यांची शिडी बसवली आहे. ती सांभाळून चढल्यावर आणखी एक कठीण आणि धोकादायक उभा चढ आहे. इथेही एक डळमळणारी,अरुंद आणि अर्धवट उंचीची शिडी बसवली आहे. शिडीच्या टोकावरून पुढचा कातळ अतिशय सावध, तोल सांभाळत एक एक करून चढावं लागतं. शिडीच्या पायंड्या दोरीनं बांधल्या असून त्या वरखाली, तिरकस झाल्या आहेत. शिडी अरुंद आणि कातळालगत खाचेत अडकवल्यानं, चढता उतरताना तोल पूर्ण बाहेरील बाजूस दरीकडे राहतो. अगदी थोडीशी घाई किंवा या उंचीमुळं क्षणभर संयम सुटल्यास जीवावर बेतू शकतं. बरेच नवखे या शिडीपासून माघारी फिरताना दिसतात.
सह्याद्रीत विशेषतः ऑफबीट ट्रेकला शेवटी शेवटी असे अवघड आणि धोकादायक टप्पे नक्कीच अनुभवायला येतील.
शनिवार-रविवारी मात्र या शिडीजवळ भगव्या कफनीत एक म्हातारा उभा असतो. शिडी तीच आहे, फक्त तो खाली उभा राहून चढणाऱ्या, उतरणाऱ्यांना तोंडी मानसिक धीर देत असतो. गड चढून उतरल्यावर आपण त्याला जे प्रेमानं देऊ, ते तो घेतो. कधीकाळी अचानक अडचण उद्भवल्यास खाली इर्शाळवाडीत मदतीसाठी त्याच्यामार्फत वर्दी देऊ शकतो. इतर दिवशी तो तिथं असेलच याची खात्री देता येत नाही.
दोन्ही शिडींच्या मध्ये उतारावर असताना, आधीच वर गेलेला 'मुसाफिर' ग्रुप उतरू लागला आणि आम्हाला त्या अवघड जागी अर्धा तास अवघडून उभं राहावं लागलं. त्याच वेळी खालून अंधेरीचे 'टीम किल्लेदार' ट्रेकर्स आले आणि त्या धोकादायक, अपुऱ्या जागेत गर्दी झाली. एखाद्याची थोडीशी चूकही इतरांना भोवते तसं आमच्यासाठी ते धोकादायकच होतं, पण इलाज नव्हता.
'टीम किल्लेदार' खाली असल्यानं आम्हाला वर चढाई करण्यास त्यांची मदत झालीच.

शिडीचे टप्पे

दोन्ही टप्पे वर चढुन आलो की आपण सरळ नेढ्यात पोहोचतो. हे नेढं म्हणजे डोंगराच्या कातळाला नैसर्गिक रीतीनं पडलेलं छिद्र.. सह्याद्रीत अशी बरीच नेढी आहेत. येणाऱ्या वाटेकडं पाठ करून या नेढ्यात उभं राहिलं की खाली इर्शाळवाडी दिसते. समोर मोर्बे धरणाचा जलाशय अगदी लहान वाटू लगतो, आणि त्या समोरील विस्तृत परिसर नजरेसमोर येतो. उजव्या हाताला दूरवर धुक्यात कर्नाळा दिसतो. वातावरण नितळ असेल तर तो कॅमेऱ्यातही घेता येईल. तर मागे प्रचंड दरीपलीकडचा प्रबळगड नजरेत आणखीनच 'प्रबळ' दिसतो. प्रबळ च्या मागेच माथेरान डोंगर, बेलाग चंदेरी आणि दूरवर मलंगगड असा सारा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो.
इथं वाऱ्याचा मारा इतका आहे की नेढ्यात जपूनच उभं राहावं लागतं. इथला घोंगावणारा वारा आम्ही रायगड, लोहगडलाही अनुभवला नाही. मध्ये कुठलीच आडकाठी नसलेल्या मोर्बे जलशयावरून, पाण्याचा गारवा घेऊन थेट इर्शाळला भिडतो. कॅमेऱ्यात व्हिडीओ घेताना त्याचा रुद्र आवाज अनुभवता येतो.
या वाऱ्याच्या माऱ्यामुळंच झीज होऊन या अजश्र कातळाचे छोटे मोठे भाग निखळत असावेत. हे नेढं आणि आधी उल्लेख केलेला वाटेवरचा मोठा कातळ असाच निखळला असावा. आम्ही इथं हा अवघड टप्पा चढुन नेढ्यात येण्यापूर्वी असाच एक वर खडकाचा छोटा तुकडा निखळून वेगानं खाली आला आणि 'टीम किल्लेदार' मधील एकाच्या उजव्या हाताला चाटून गेला. जखम झालीच पण थोडक्यात निभावलं. त्यावेळी आम्ही तिथंच होतो.
नेढं ओलांडुन वाट डाव्या बाजूला एक छोटा पण सोपा कातळ चढून नेढ्यावरील सपाटीवर येते आणि सरळ आकाशाला गवसणी घालणाऱ्या सुळक्याच्या पायाशी येऊन संपते. वर कातळालगतच कोरलेली पाण्याची टाकी आहे. सुळक्यावर चढाई करण्यासाठी मात्र दोर आणि प्रस्तरारोहण (रॅपलिंग ची) कला आणि त्या साहित्याची गरज आहे.
कोरलेल्या पाण्याच्या टाकीवरून इर्शाळगडचा टेहळणीसाठी उपयोग केला जात असावा. इतिहासात 'इर्शाळ'चा विशेष उल्लेख नाही. पण 1666 च्या मे मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी आणि रायरी पर्यंतचा मुलुख ताब्यात घेतला. त्यावेळी इर्शाळगड स्वराज्यात सामील झाला.
गडपायथ्याला असलेलं 'चौक' हे राजा शिवछत्रपतींचे निकटवर्ती आणि शत्रूच्या उरात धडकी भरवणारे, स्वराज्याचे पहिले सरसेनापती नेतोजी पालकर यांचं जन्मगांव आहे. आणि महाराजांची तीसरी पत्नी, पुतळा राणीसाहेब याच पालकर घराण्यातील होत..
|| श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव
जिद्द,चिकाटी,साहस,आणि धैर्य यांचा सुरेख संगम म्हन्ज़े हि इर्शाल् गढाची चढ़ाइ.
ReplyDeleteVery difficult task 😟J K Jadhav Saheb. Keep it up and be take care ✌️👍
ReplyDeleteChaaan 😍👍
ReplyDeleteVery inspiring.Indeed I shall trek some day.
ReplyDeleteMast 👌👌
ReplyDeleteVery nice blog 👍👍
ReplyDeleteजाधव साहेब Superb
ReplyDeleteसोप्या व ओघवत्या शैलीत आपण केलेल्या ट्रेक चे वर्णन खूप खूप आवडले. वर्णना बरोबर दिलेल्या photos मूळे अधिक माहिती मिळाली. खुप अवघड वाटा चोखळताना आपण दिलेल्या photos चा पुढील trekkers ना निश्चित फायदा होईल.आपणास पुढील सर्व भटकंती साठी खूप शुभेच्छा.keep it up.
Khuuuup mast.....👍👌👌👌😃
ReplyDeleteसुंदर वर्णन 👍✌
ReplyDeleteVery nice blog.
ReplyDeleteMasta ❤️
ReplyDeleteखुप सुंदर वर्णन खुप छान
ReplyDeleteखुप सुंदर वर्णन खुप छान
ReplyDeleteAmazing 👌👍
ReplyDeleteअतिशय सुंदर वर्णन,प्रत्यक्ष पहिल्या सारखे वाटले.👌👍
ReplyDeleteVery nice blog.
ReplyDeleteBest blog, this is helpful for all during any trekking forsafe & enjoyful tour. Thank you my friend Jaywant Jadhav Saheb.
ReplyDeleteदादासाहेब,आपण दिलेली माहिती खुप छान आहे.पुढील गडभेटीस शुभेच्छा ! धन्यवाद 🙏
ReplyDeleteसुंदर सविस्तर ट्रेक वर्णन.परतीच्या पावसाळी रात्री अंधारात
ReplyDeleteप्रवास..तुमच्या हिंमतीची दाद द्यायला हवी
मस्त खूप छान
मस्त लिहिलंय अनुभव.
ReplyDeleteबढिया
Good reporting and guidance keep it up ☺️
ReplyDeleteखुप छान आहे.असेच लिहित रहावे
ReplyDeleteVery nice blog....keep it up👍
ReplyDeleteखुप सुंदर अनुभव..
ReplyDeleteखूप छान
ReplyDeletekhup chan
ReplyDeleteछान आहे👍👍👍👍👍👍
ReplyDeleteखूप अभ्यास पूर्ण माहिती. अशा ठिकाणी जाण्यासाठी शिवराय समजून घ्यावे लागतात आणि ते तर तुमच्यात पूर्ण मुरलेले आहेत.
ReplyDeleteतुमचे पूर्ण कुटुंबच शिववेडे आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
ब्लॉग सादर करण्याची पद्धत मनाला भिडणारी आहे,
हा अनुभव आमच्या सारख्यां बरोबर वाटण्या बद्दल खूप धन्यवाद
धन्यवाद. 🙏
ReplyDelete