आजपर्यंत भेट दिलेली घारापुरी, अनेकदा भेट दिलेली कान्हेरी, वेरूळ, अजिंठा, भाजे लेणी, कार्ल्याची लेणी इत्यादि नजरेसमोर होतीच. मग इथंही भेट द्यायचं ठरलं.
![]() |
मंदिरासमोरील समाध्या (Dharashiv Caves -Usmanabad) |
'तेर'हुन नैऋत्येला असलेलं २२ किमीचं उस्मानाबाद (आधीचं नांव 'धाराशिव') तासाभरात गाठलं. लेण्याकडं जाण्यासाठी उस्मानाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातूनच जावं लागतं. गल्लीबोळातल्या या रस्त्यांचं काम त्यावेळी चालू होतं. आज सलग प्रवास आणि भटकंतीचा आमचा दूसरा दिवस होता. स्वतः ड्रायव्हिंग करणं, ही इथली शनिवारची ट्रॅफ़ीक मधली संध्याकाळ, रस्त्याची दुर्दशा आणि स्थानिक रिक्षावाले या सर्वांनी मेटाकुटीला आणलं. औटघटकेत इथेही जावून येऊ, या उमेदीनं अडचणींना तोंड देत होतो.
उस्मानाबादच्या वायव्येला ५ किमीवर असलेल्या लेण्यांकडे शहर सोडून पुढे पठारावरून उतार होत जाणारा रस्ता बऱ्यापैकी आहे. रस्ता संपतो तिथेच डावीकडं चेकपोस्ट आहे. तिथून खाली उतरणाऱ्या सिमेंटच्या पायऱ्या सुरू होतात. वेळ उशीरा संध्याकाळची असल्यानं,एखादं कुटुंब वगळता आम्ही पोहाचेपर्यंत तिथून सर्वजण परतले होते. चेकपोस्टवर कोणी कर्मचारी किंवा पहारेकरी असावा वाटलं, पण तसं काहीच दिसलं नाही. पुढं आम्ही फक्त चौघेच उरलो.
![]() |
लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या |
![]() |
समाधी मंदिर (Dharashiv) |
![]() |
समोर समाधी मंदिर आणि उजवीकडे पहिली लेणी |
![]() |
सभामंडपातील शिवपिंडी |
![]() |
मंदिराच्या सभामंडपातून गाभारा |
![]() |
समाधी मंदिरातील ओवऱ्या (Dharashiv) |
![]() |
छतावरून दिसणारं दृश्य (Dharashiv) |
![]() |
गाभाऱ्यातील मूळ शिवपिंडी |
![]() |
पहिल्या लेण्यातील बुद्ध मूर्ती (Dharashiv Caves) |
![]() |
पहिली लेणी (Dharashiv Caves) |
![]() |
दुसरी लेणी (Dharashiv Caves) |
![]() |
दुसरी लेणी |
![]() |
तिसरी लेणी (Dharashiv Caves) |
![]() |
तिसऱ्या लेण्याची प्रवेश कमान |
![]() |
चौथी लेणी (Dharashiv Caves) |
![]() |
तिसऱ्या लेण्यातील दुरुस्ती |
तर पुढची चौथी लेणी आकारानं लहान असून, तिचीही दुरुस्ती चालू असल्याचं दिसतं.
या चार लेण्यांपैकी पहिली लेणी वगळता, पुढची तीन लेणी कधीकाळी ढासळली असावीत. सध्या त्यांच्या दुरुस्तीचं काम घेतलेलं दिसतं. त्यांचं मूळ सौंदर्य नष्ट झाल्याचं जाणवतं. दुसरी आणि तिसरी लेणी भव्य आहेत. काळाच्या ओघात त्यांचीही पडझड झाली असून कोरीव काम नष्ट झालेलं दिसतं. एकंदर या लेण्यांकडे शासनाचं दूर्लक्ष झाल्याचं दिसतं. तरुण हौशी पर्यटकांनीही या लेण्यांच्या आणि मंदिराच्या भिंतींवर आपल्या भावना लिहून प्रताप दाखवलेले दिसतात.
ही पाचव्या शतकातील बौद्ध लेणी बाराव्या शतकात जैन लेण्यात परावर्तित झाली असावीत.
या लेण्यांबद्दल विस्तृत माहिती 'लोकसत्ता'च्या 'लोकभ्रमंती' सदरात 'श्री अमित सामंत 'यांनी लिहिलेला लेख ७ डिसेंबर २०१६ ला प्रसिद्ध झाला होता. डोंबिवलीचे श्री अमित सामंत यांचा विविध गड, किल्ले, प्राचीन मंदिरं, लेणी या बाबत गाढा अभ्यास असून, ट्रेकिंग क्षेत्रातील मी त्यांना दिपस्तंभ समजतो. 'डोंगरभाऊ' हा त्यांचा या क्षेत्रातील स्वतंत्र मराठी ब्लॉग असून, 'ट्रेकक्षितिज' या ट्रेकिंग क्षेत्रात आज अग्रगण्य असलेल्या संस्थेसाठी त्यांचं योगदान आहे. या ब्लॉग निमित्त इथं या इतिहास अभ्यासकाचा उल्लेख येणं हा बहुमान समजतो. धाराशीव आणि आजूबाजूच्या ऐतिहासिक ठिकाणांबद्दल https://samantfort.blogspot.com/2017/10/blog-post.html?m=1 या त्यांच्या लिंकवर अभ्यासपूर्ण माहिती मिळते.
आधी 'किल्ले परांडा' ब्लॉगमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे 'धाराशिव' हे दक्षिण आणि उत्तरेच्या प्राचीन व्यापारी मार्गावरील महत्वाचं ठिकाण होतं. तर आम्ही आता जिथून आलो ते 'तेर' म्हणजेच 'तगर' हे प्राचीन काळी व्यापार, संस्कृती आणि धर्म प्रचाराचे एक प्रमुख केंद्र असल्याचा उल्लेख, गोरोबा काकांच्या ब्लॉगमध्ये केला आहेच. त्यामुळं बाजूला संरक्षणासाठी भुईकोट 'किल्ले परांडा' आणि व्यापार प्रवासादरम्यान आरामासाठी ही 'धाराशिव लेणी' त्यावेळी वापरात आली असावीत.
वाढणारा अंधार आणि तुळजापूर मुक्काम वेळेत गाठण्यासाठी आम्ही पलीकडील तीन लेण्यांना भेट देवू शकलो नाही याची हुरहूर राहिलीच..
|| श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव